फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं फर्मान काढतो. कारण पक्षी येणाऱ्या पिकांच धान्य खातात. फर्मान काढताच लोकं कामाला लागतात. कुणी औषधांची फवारणी तर कुणी शिकार करू लागतात. मग काय पाहता पाहता…

वाघोबाचा लॉकडाऊन…..!

आज पायटी का नाई राजेहो, माया सपनात जंगलातला वाघोबा आला. म्हणे का रे बावा.., काय चालू हाय तुयावालं..? काय म्हणते तुये मानसं…? अन तुय शिमीटाचं जंगल…? म्या म्हन्ल तुमाले कायच सांगु राजेहो…! इथं त बेज्जाच वाट लागून हाय. लोक कसेच्या…

कोरोनातही वनरक्षक ऑन ड्युटी २४ तास….!

कोविड-१९ मुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झालंय. मात्र महसुल, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र आपल्यासाठी कार्य करीत आहे. सगळीकडे त्यांच कौतुक होत आहे, आणि ते झालही पाहिजे, कारण संपूर्ण मानवप्रजातीच्या सुरक्षिततेसाठीच ते झटत आहेत. मात्र आपल्याला प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाऱ्या…

लॉकडाऊन म्हणजे दोस्ती निसर्गाशी…!

बहर आलेली बाग कुणाला आवडणार नाही…! झाडं, झुडुपं, घरातील फुलझाडे, रोपटे जे घरातील परसबागेत किंवा आपल्याला हवे त्या ठिकाणी अथवा कानाकोपऱ्यात का होईना मात्र शोभून दिसतात. अगदी घरातल्या खिडकीत असलेलं एकट झाड, त्याच खिडकीजवळ बसून पाहणे हृदयाला आनंदाने भरण्यासाठी पुरेसे…

जंगलाची होळी…..!

वसंत आपल्या येण्याची वर्दी माघातल्या वसंत पंचमीला देतो. हा वसंतोत्सव जवळजवळ वैशाखापर्यंत चालतो. आम्रवृक्ष, पळस, पांगारा, काटेसावरासह आदींना वसंताची चाहूल लागते. म्हणूनच नक्षत्रांची ही रांगोळी व त्याच्या पावलांचे ठसे जंगलावर रेखाटले जातात. इतकंच काय हा वसंत मानवाच्या उत्सवप्रियतेलाही प्रोत्साहन देतो.…

चिऊताईचा वाढदिवस….!

मी मुळचा खेडूत, बालपण शेती, चिमणी, कावळा, तितर, बटेर, फुलपाखर, सोनपाखर, प्राणी अन जंगलात गेलं. घरात धान्य वाळायला टाकल की चिमण्या ताव मारायला हमखास यायच्या. बिब्याची फुलं, टेंभूर्ण, बोर खायला गेलं की असंख्य पक्षी दिसायचे. गावातही चिमण्या कावळे भरपूर होते.…

समृद्ध वैभव : नरनाळा

सातपुडा पर्वत हा प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत आहे. प्राचीन पर्वत एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील समृद्ध जैवविवीधता हा देखील इथला खास दागिना आहे. या पर्वत रांगा मध्ये अनेक राष्ट्रीय उद्यान व अभयारण्ये वसली…

सर्पप्रज्ञाचक्षु : अक्षय खांडेकर

सर्पप्रज्ञाचक्षु : अक्षय खांडेकर जन्मताच आपल्याला दृष्टि नसते. ती यायला काही दिवस लागतात. निसर्गात मात्र असे अनेक वन्यजीव आहेत की त्यांच्या वाट्याला कायमचं अंधत्व असतं. त्यांच जगणंच मुळात गुढ असतं. अस चमत्कारी विश्व उलगडण त्याहूनही कठीण नाही का…? मात्र एक…

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे

खगायनकार : डॉ अनिल पिंपळापुरे पृथ्वी निसर्ग नियमानुसार चालते. आपण जे पेरतो तेच उगवते. पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. म्हणजेच कोणतीही गोष्ट वा आवडिच कार्य करण्यासाठीची वेळ कधीच निघून गेलेली नसते. वेळ आणि काळ परत येत राहतो आणि…

अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर

अरण्यसखा किल्लेदार: डॉ. जयंत वडतकर निसर्गवेडे सृजनशील असतात. हिरव्या डोळ्यातून ते निसर्गाकडे बघत असतात. वेगळेपणाच्या शोधात ते कायम भटकंती करीत असतात. त्यांची अनेकांगी दृष्टी सतत काहीतरी नवीन शोधत राहते. त्यांच जीवन म्हणजे केवळ जंगल फिरणे, पक्षी आणि फुलपाखरे पाहणे इतकंच…