शैलाश्रयाचे साधक : डॉ. विजय इंगोले

‘माझं एक आभाळ आहे’ त्यात मी रमतो, त्यात मी जगतो, त्यातच माझं सृजन….! आणि या आभाळाला खरच सीमा नाही, ना कोणती मर्यादा, ना कोणती फिकीर…! माझा आनंद त्यातच….! खरच आहे ना कारण काही व्यक्ती आणि त्यांच कर्तुत्व असतच मुळात तस…! व्यक्तीमत्वाला अनेक पैलू असतात. त्या प्रत्येक पैलूच एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकत, इतकी त्या व्यक्तीत आणि त्या पैलुत ताकद असते. पक्षी असो की निसर्ग, अभियांत्रिकी असो की संशोधन आणि याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे न भूतो न भविष्यती वाटणारा शोध चक्क यांच्याच तीक्ष्ण नजरेतून लागावा. हा केवळ योगायोग असू शकत नाही. निसर्गाची निस्सीम भक्ती आणि शाश्वत कर्तुत्वाची जोड दिल्याशिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे सृजन आणि तेजोपुंज लकाकल्या शिवाय राहत नाही. म्हणूनच आपल्या स्व:पनाच्या आणि मनाच्या आभाळात राहून तेच आभाळ कवेत घेण्याची ताकद ठेवणारे डॉ.विजय इंगोले हे एक वेगळच रसायन आहे. नजरेत दुर्दम्य इच्छाशक्ती, पाय जमिनीवर आणि प्रचंड आशावादी आणि इतकंच काय तर एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी उर्जा घेऊन फिरणारे डॉ.विजय इंगोले साक्षात प्रेरनापुंजच आहे. वनभ्रमंती आणि पक्षी निरीक्षणाच्या छंदापायी त्यांच्या हाडामासात संशोधन वृत्ती, चिकाटी, संयम, खडतर प्रवास आणि निरपेक्ष भटकंती करण्याची वृत्ती रुजली असल्याच सांगताना ते एक लांब उसासा घेतात. या लांब उसाश्यात दीर्घ अनुभव आणि प्रचंड माहितीचा खजिना असल्याचा आपल्याला भास होतो. चुम्बकासारख वाटणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक एक पैलू उलगडताना आपण थक्क होऊन जातो. ‘अरण्यगर्भ’ ते ‘अश्मयुगांतर’ कार असा डॉ.विजय इंगोले यांचा प्रवास म्हणजे एक मोठे तप आहे. या साधकाच्या तपाची कहाणी या लहानश्या लेखात करता येन शक्यच नाही. वेगवेगळे पैलू अंगी असतांना व्यक्तिरेखा रेखाटन सहज कळत नाही उमजत देखील नाही.

शैलाश्रयाच्या प्रत्येक स्थळात वेगवेगळे अनुभव येत होते. प्रत्येक शैलाश्रयाची ठेवण वेगळी होती. कोठे गुहेत गुढ समाधी तर कोठे प्रपात कोसळत असल्याच्या खुणा, कोठे छतावर रेखाटलेली गुढ चित्रे, जमिनीत पडलेली भेग तर कोठे शैलाश्रयाच्या प्रांगणात असलेली लहान छिद्रे असे प्रत्येक थरारक अनुभव अंगावर काटे उभे करणारे होते. जेथे शैलाश्रय आहे तेथील पर्वताची चढण चढतांना ओणव होऊन तर कधी दोराच्या सहायाने खडक चढणे तर कधी गुढगाभर सुकलेल्या अन साचलेल्या पानांच्या थरातून चालत जाणे तर कधी खोल दरीच्या अरुंद रस्त्यावरून केलेली पायपीट आणि तो प्रसंग सांगताना डॉ.विजय इंगोले भावूक होतात. अनादी काळापासून लपून अन दडून बसलेल्या शैलाश्रयाचा हा शोध एक उत्क्रांतीयुगातील क्षणांचा साक्षीदार असल्याचा भासतो. आपल्या पाच सहकाऱ्यासह अश्मयुगीन शैलाश्रयाचा शोध डॉ. विजय इंगोले यांच्या आयुष्यातील एक वेगळाच ग्रंथ आहे.  अमरावतीपासून सुमारे ८५ किमी अंतरावर मोर्शीजवळच्या सातपुडा पर्वतावर सर्वात उंचीवर असलेल्या मुंगसादेव या १४३ फूट बाय २५ फूट रुंद आणि तेवढ्याच उंचीच्या गुहेत प्रचंड शिळेवर अश्मयुगीन चित्रे त्यांना आढळून आली. ज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ. व्ही.टी. इंगोले, निसर्ग लेखक प्र.सु. हिरुरकर, शिरीषकुमार पाटील, ज्ञानेश्वर दमाहे, पद्माकर लाड आणि डॉ. मनोहर खोडे या सहा जणांच्या पथकाने या गुहाचित्रांचा शोध लावला आहे. यामध्ये वाघ, हत्ती, जिराफ, गेंडा, सांबर, चितळ, रानडुक्कर, अस्वल, वानर, रानकुत्रे हे वन्यप्राणी, तर गिधाड या पक्षाचे एकमेव चित्र गेरूसारख्या लाल रंगात साकारलेली आहेत. एवढेच नव्हे, एका गुहेत फांदीवर झोके घेणा-या आदिमानवाचे चित्रही लक्ष वेधून घेते. यात मानवाचे पाय मात्र वानरांच्या पंजासारखे दाखवले आहेत. कळपाने राहणा-या वन्यप्राण्यांत एके ठिकाणी रानकुत्र्यांचा कळपही चित्रीत केला आहे. हजारो वर्षांपूर्वी अश्मयुगातील आदिमानव समूहाने पर्वतावरील गुहेत राहायचा. तो शिकार करून व कंदमुळे खाऊन जगायचा असे सदर्भ आहेत. धोकादायक प्राणी आणि उपयुक्त कोणता याचे ज्ञान समूहातील तरुणांना व्हावे, यासाठी शिक्षण व संवादाचे साधन म्हणून या गुहाचित्रांचा वापर होत असावा, त्यांचा कयास आहे.

भारतात अशा प्रकारची गुहाचित्रे मध्य प्रदेश मधील भीमबेटका तर जगात फ्रान्स, आफ्रिका, आॅस्ट्रेलिया येथेही अशा प्रकारची गुहाचित्रे आहेत. भारतीय उपखंडातील मानवी जीवनाची सुरुवात विंध्य पर्वतात झाली. तो सुरुवातीला गुहेमध्ये समूहा-समूहाने राहत होता. पुढे हा मानव सातपुडा पर्वतावर आश्रयासाठी आला. आपण जगत असलेल्या जीवनशैलीचे टिपण त्याने चित्रभाषेत करून येणाऱ्या पिढीला त्याबाबत अवगत करण्याचा प्रयत्न केला असावा. यावर डॉ.विजय इंगोले यांनी ‘अश्मयुगांतर’ हे पुस्तक सुद्धा लिहिले आहे. मानवी अभिव्यक्तीचा हा सर्वात जुना ठेवा एक सोनेरी संचित आहे. हा ठेवा आता पुढच्या पिढीला वारसात मिळणार हे मात्र नक्की…!

डॉ.विजय इंगोले यांच शिक्षण बी.इ., बी.टेक., पी.एच.डी., पर्यंत झालंय. आजवर सन १९७४ ते २०१८ पर्यंत डॉ.विजय इंगोले यांच्या नावावर तब्बल ३२ पेटंट आहेत. क्रॉम्पटन ग्रीव्हस सारख्या नामांकित कंपनीत मुख्य संकल्पना अभियंता म्हणूनच नव्हे तर आजवर एकूण ६० हून अधिक वस्तूंच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पी.आय.सी.टी. पुणे आणि प्रा.राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सरांनी तब्बल १८ वर्ष सेवा दिली आहे. ‘अरण्यगर्भ’ या पुस्तकाच्या लेखनासह त्यांना किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार आणि अश्या एकूण सहा पुरस्काराने आजवर गौरविण्यात आलय. ते सध्या अमरावती येथील त्यांचे संशोधन व्यासपीठ ‘ग्रीन सर्कल’च्या माध्यमातून निरंतर कार्य करीत आहेत. शैलचीत्रांच्या या सोनेरी शोधकार्याच्या ‘शैलचित्रशोधाचे कर्णधार’ असलेल्या डॉ. विजय इंगोले यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. ते एका लेखात देणे शक्य होणार नाही. म्हणून तूर्तास इतकच….!

@ यादव तरटे पाटील

   वन्यजीव अभ्यासक,

दिशा फाउंडेशन, अमरावती

     संपर्क- ९७३०९००५००

email- disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

 

 

11 thoughts on “शैलाश्रयाचे साधक : डॉ. विजय इंगोले”

  1. सर्वप्रथम वेबसाईट सुरु केली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
    व्हि.टी. इंगोले सरांच्या बद्दलचा आपला लेख आवडला.
    खूपच छान लेखन केलं आहे.
    आपला
    शिरीष कुमार पाटील

    1. आदरणीय कुमार सर
      आपल्या नावातच कुमार आहे. म्हणजे आपणही या पृथ्वीवर अजरामर आहात. मी किंवा आपण दोघेही शरीरानेसंपून जाऊ पण व्ही.टी.सर आणि तुमच्या सारखी व्यक्ती असीच जिवंत राहील. आशीर्वाद आणि शुभेच्छा बद्दल आभारी आहे. धन्यवाद

  2. To write about Shi Ingole, you introduce us his great work . Till today like me so many dont know his contribution towards our ancient history.
    Thank you very much to provide us this information.
    I am requesting you if possible share sone your some forest experiences especially photos inside forests on this site.

    Thank you.

    1. Dear Surve Sir
      Thank you very much. yes off course I will share it. Thank you very much once agian.

  3. Very nice interesting, sir this Rock painting site is in M.P. or in Maharashtra, it my be in M.P.

  4. Very nice interesting, sir this Rock painting site is in M.P. or in Maharashtra, it my be in M.P. Ref.RASI. Journal

  5. नमस्कार,
    डॉ व्ही टी सर ज्यांना गोतावळ्यात ” दादा साहेब ” या नावांने ओळखतात त्यांच वेगवेगळ्या विषयांवर च वाचन आणि तितक्याच तन्मयतेने चिंतन इतकंच नाहि तर कृती मध्ये उतरवण्याची क्षमता हि मला आवडणारी बाब. मिश्किल पणा तितकाच सडेतोड पणा आणि तितकीच सहजता फार अभावाने आढळते, अर्थात अपवाद दादासाहेब.
    आपण लेखातून दखल घेतली उत्तमच
    जमत असेल आणि त्यांची सहमती असेल, त्यांच्या “दिलखुलास अभ्यासपूर्ण गप्पा चे व्हिज्युअल डॉक्युमेंन्टेशन असायला हवं असं माझं मत

    1. नमस्कार सर,
      धन्यवाद आणि अनंत आभार,
      नक्कीच मी आपल्या मताशी सहमत आहे. श्री. शिरीषकुमार पाटील यांनी बहुदा केले असावे पण मी शहानिशा करतो. आणि सुचना अतिशय सार्थ आणि स्तुत्य आहे. व्हायलाच हवे असे ऑनलाईन पंजीकरण….! धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *