फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व इतर काही जीव विषारी असतात हे आपल्याला माहित आहे. मात्र फुलपाखरे विषारी असतात यांवर कुणाचा विश्वास बसणार नाही. विषारी सापाने चावा घेतल्यास मानवाचा मृत्यू होऊ शकतो तर विंचू चावल्याने त्रास होतो. मात्र फुलपाखरांच्या बाबतीत अस आपण कधीच ऐकलेल नाही. म्हणून फुलपाखरे विषारी असतात का? अस म्हटलं तर लोक नक्कीच वेड्यात काढतील. पण हे सत्य आहे, कारण फुलपाखरे विषारी असतात. पण ते चावा घेत नाहीत व त्यांच्यामुळे कुणी माणसही दगावत नाही. मात्र, काही विषारी जातींच्या फुलपाखरांना एखाद्या पक्ष्याने जर खाल्ले तर त्या पक्ष्याचे काम तमाम झाल्याशिवाय राहत नाही. खर म्हणजे पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी फुलपाखरांच्या शरीरात असलेलं हे विष फुलपाखरासाठी मात्र वरदानच ठरते.


फुलपाखरे दिसायला सुंदर असतात एवढी जनमानसात त्यांची ओळख आहे. पण फुलपाखरांचे त्याही पलीकडे एक चमत्कारिक विश्व दडलेले आहे. फुलपाखरे विषारी असतात. विषारी सापाने दंश केला कि कोणताही सजीव दगाऊ शकतो. मात्र फुलपाखरांचं जरा वेगळं आहे. ते चावत नाहीत आणि त्यांना दातही नसतात. यामध्ये आश्चर्यकारक असे कि, फुलपाखराला जर का एकाद्या पक्ष्याने खाल्ले तर तो पक्षी मात्र दगावू शकतो. अनेक पक्षी फुलपाखरे आवडीने खातात. पक्ष्यांना फुलपाखरांपासून मोठ्या प्रमाणात उर्जा मिळते. विशेषतः विणीच्या काळ्यात पिल्लाना भरवीण्यासाठी पक्षी खास करून फुलपाखरांचा समावेश करतात. वेडा राघू, कोतवाल व इतर अनेक पक्षी फुलपाखरे आवडीने खातात. मात्र काही प्रजातीची फुलपाखरे विषारी आहेत. पक्ष्यांपासून बचाव व्हावा म्हणून त्यांना निसर्गाने दिलेलं हे एक वरदान आहे.
फुलपाखरांच्या कुंचलपाद (Nymphaliadae) कुळातील ‘पट्टेरी रुईकर’ (Striped Tiger) नावाचे फुलपाखरू विषारी म्हणून प्रसिद्ध आहे. कारण याची मादी हे विशिष्ठ वनस्पतीच्या पानावर आपली अंडी देते. ज्या वनस्पतीचे पान किंवा देठ तोडल्यास दुधासारखा पदार्थ ज्यातून स्त्रवतो अश्या वनस्पतीना आपण दुधी वनस्पती (Milkweed plant) म्हणतो. हे फुलपाखरू त्यावर आपली अंडी देते. याचा सुरवंट त्या वनस्पतीची पणे खाऊन आपली उपजीविका पूर्ण करतो. म्हणून त्यातील विषारी अंश फुलपाखराच्या शरीरात येतात.

‘पट्टेरी रुईकर’ हे फुलपाखरू ‘रुई’ च्या झुडुपावर अंडी देते. त्यांच्या पंखावर वाघाच्या अंगावर असतात तसे पट्टे असतात. हे फुलपाखरू भारतात सर्वत्र आढळते. साधारण: मध्यम आकाराच्या फुलपाखरांच्या पिवळ्या पंखांवर काळे पट्टे असतात. अमेरिकेत आढळणाऱ्या ‘मोनार्च’ या फुलपाखराशी याचं बरंच साम्य आहे. नर व मादी दोन्ही फुलपाखराचे पंख सारखेच असतात. या फुलपाखरांच्या माद्या ‘अस्केपिएडीसी’ कुळातील झाडांच्या पानावर अंडी घालतात. अंडय़ामधून बाहेर येणारे सुरवंट हे काळ्या रंगाचे असतात. त्यांच्या अंगावर पांढऱ्या पिवळ्या रेषा व ठिपके असतात. सुरवंटची वाढ झाल्यावर ते कोषात स्वत:ला गुंडाळून घेतात. सुरवंट ज्या झाडांची पाने खातात, त्यात विषारी द्रव्य असतात ती सुरवंटाच्या व पर्यायाने फुलपाखरांच्या शरिरात जमा होतात. म्हणजेच रुई या वनस्पतीमधील विषाचा अंश पक्ष्याच्या शरीरात जाणारच. जर का हे फुलपाखरू एका चिमणीला किंवा बुलबुल पक्ष्याने खाल्ल तर त्या पक्ष्याला इजा होण्याइतपत हे फुलपाखरू पुरेस आहे. म्हणून सहसा असे पक्षी या फुलपाखरापासून सावध असतात. मात्र एकीकडे हेच फुलपाखरू कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल अनेकदा मी जंगलात पाहिलेलं आहे. अशी अनेक उदाहरण व रहस्ये आपल्याला रानावनात भटकतांना दिसतात. निसर्ग स्वताच नियमन करतो हे याचेच उत्तम उदाहरण म्हणता येईल.

@ यादव तरटे पाटील
सदस्य – राज्य वन्यजीव मंडळ, महाराष्ट्र शासन
संपर्क – ९७३०९००५००

20 thoughts on “सौंदर्यात दडलंय विष…!”

 1. खुपच छान माहीती मिळालीय सर.
  तुमच्या प्रत्येक ब्लाॅगमध्ये प्रत्येकवेळी नवनविन माहीती मिळते,
  धन्यवाद

 2. खुप छान सर…आम्हाला केवळ फुलांवर असणारे रंगबिरंगी फुलपाखरू एवढंच माहीत होत…..फुलपाखरांबद्दल आपला लेख वाचून ज्ञान वृद्धींगत झाले???

 3. नमस्कार सर,
  आपण दिलेल्या फुलपाखरांच्या माहितीतून खरच नविन असे पहावयास मिळते. आपल्या प्रत्येक जंगल विषयक लेखातून
  नवीन माहिती पटवून (समजवून) दाखविलेली असते.

  1. धन्यवाद सुनील जी
   खूप खूप आभारी आहे.

  2. खूपच उपयुक्त, प्रबोधनात्मक, वैज्ञानिक पाया लाभलेली सामाजिक बांधिलकीतून माहिती मिळाली…यादवरावांचे निसर्गप्रेम सर्वश्रुत आहेच. अभ्यासपूर्ण लेखनासाठी मनःपूर्वक धन्यवाद अभिनंदन व सदिच्छा.
   प्रा. महेश हंबर्डे, जाणीव पुसद

 4. मला तर लेख खूप आवडला आणि लेखाला दिलेलं शीर्षक ही आवडले… फुलपाखरू विषारीही असतात हे माहिती नव्हतं…. सर्वात सुंदर फुलपाखरे अमेझॉन च्या जंगलात आढळतात…जगातील कोणत्याही फुलपाखरांना त्याची सर येऊ शकणार नाही अस मी वाचलं होतं….. अमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीत फुलपाखरांच्या प्रजाती पण नष्ट झाल्या असणार..ना…. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत ?

 5. निसर्गातील अतिशय सुंदर कीटक म्हणजे फुलपाखरू, परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो विषपान करतो,ही माहिती फारच रंजक आहे.

 6. खुपच छान माहीती मिळालीय सर….फुलपाखरू विषारीही असतात हे माहिती नव्हतं..मला केवळ फुलांवर असणारे रंगबिरंगी फुलपाखरू एवढंच माहीत होत… आता ते पण दिसेनासे झाले आहेत…..आपला लेख वाचून ज्ञानात भर पडली …

  1. धन्यवाद मित्रा
   फुलपाखरे पक्षी साठी काही प्रमाणात विषारी असतात.

 7. खुपच छान माहिती दिलीत सरजी..

 8. मराठीतून छान माहिती दिली . खूप खूप धन्यवाद. ??????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *