ज पायटी का नाई राजेहो, माया सपनात जंगलातला वाघोबा आला. म्हणे का रे बावा.., काय चालू हाय तुयावालं..? काय म्हणते तुये मानसं…? अन तुय शिमीटाचं जंगल…? म्या म्हन्ल तुमाले कायच सांगु राजेहो…! इथं त बेज्जाच वाट लागून हाय. लोक कसेच्या कसेच करून रायले. निरा भेदरले हायेत. त्यायले भल्लाच झ्याम्या बसला. या कोरोनान तं भल्लाच कहर करून टाकला हाय. कवा नसन झालं ते आता हून रायल. संचारबंदी का कोणती बंदी होय, देव जाणे ब्वा. कोणी कोणाच नाई आयकून रायल. जो थो आपलीच भादरून रायला. वाघोबा म्होरं सांगु लागला, खर सांगु का राज्या तुले, तसे बी आमचे लोकं लयच शेफारले होते. निरा नाम कवा बी काई बी करून रायले होते. वाटलं तवा झाड तोड, वाटलं तवा परदूषण कर, वाटलं तवा पलास्टीकचा कचरा कर, घंटा गाडी घरपोच येते तरीबी हे म्याट वानाचे सर्विस गल्लीत कचरा टाकते. पंतपरधान सायबानं सांगतलं नाई तरीबी हे फटाके काय फोडतत, भेटलं तवा हरण, मोर, ससा खाचा यायनं सपाटाच लावला होता. घोरपड अन तितर बटेर यैच्या जीभीचे चोचले पुरवाले यैले लागेच लागे.  यायनं लय मजा मारली अन बेज्जाच माजले बी होते. ते आयकाच्या तयारीत त न्होतेचं न्होते. हा कोरोना आला अन भल्ला देल्ला टोला त्यानं. आता बसले घरात मुंगा जिरून. मायं आयकून वाघोबा फिदीफिदी हासला, म्हणे राज्या काहीबी फेकू नको. माणूस होय ना तो. सुदरते थोडीच काई. हा कोरोना गेला की डब्बल जसच्या तसा नई झाला त माय नाव बदलून टाकजो.

मी चूप झालो बावा, काय बोलता इथं, आपून बोलाव अन त्याले राग यावं. कायले आपला कचरा करून घ्याच्या. असा माया डोस्क्यात इचार चालूच होता. तं मंदातच वाघोबा मले अजून सांगू लागला, म्हणे काहीबी असो मले त आता लयच गमून रायल. ते काय म्हणते रे, जीपस्या का फिपस्या होय तं. त्यायच्या चकरा बी बंदच झाल्या. हौसे गवसे बी बंद झाले. नईत हे मले, ना सुखान हागु देत होते, ना झोपू देत होते. सकाय झाली की माया उरावर तयारच रायत होते. काव आणला होता जीवाले राज्या यायनं. पण आता मले मस्त शिकारिले, खाले अन झोपाले काई तरासच नई रायला. आपून अन आपलं जंगल, मायी बम्म मजा सुरु हाय. हे सब्बन मी आपला कान देऊन मुकाट्यान आयकून रायलो. नई आयकत तं करता काय…! कुठी आपली ठेचून घ्याची. जंगलाच्या राज्या होय ना तो, तितं आपली काय ठाकूरकी. तो म्हणल तसं बावा…! नई का..?

दम नई घेत त तिकडून बिबट्या बी आला. त्याचा बी मुड लय खास वाटून रायला होता.  तो बी फुल्ल फुरसतीत होता. म्हणे एक्कट-डुक्कट माणसं सोळली तर त जंगलात कोनीबी येऊन रायल नई. फिराचं त सोळ मले पायाले बी कोणी येऊन राह्यल नई. नई तं जवा पायल तवा माया घरात येऊन यायनं खाना खराब करण लावला होता. जवा पायल तवा, अन त्यायले वाटलं तिथं, वाटलं ते बांधून रायले होते. इथं येऊन कायले भादरेपणा करते हेच इचीभीन मले समजून न्होत रायल. जवापासून हे टूरीजम-फुरीजम का काय होय म्हणते ना, तवापासून तुम्ही लेकहो माया जंगलात बम्म धिंगाणा सुरु केला ना….! आमचे सरे प्राणी कावल्यासारखे दिसून रायले होते. आत्ता आपलं कस हुईन याच्या कायजीन ते म्याट हून रायले होते. सुसाट जीप्स्या अन तैचा धुल्डा, आपून इकून गेलो का तीकून ते रस्त्यावर हजर, अन आपून दिसलो की निरा कावर कावर, इकून पाहू दे, तिकून पाहू दे, मोटमोठे पोंगे काढून ते त्यातून काय पायतत देव जाणे, फक्त खट खट खट आवाज येते कायचा होय त..! बर बेशरम इतके हाय की आपून जाये परेंत थे जात बी नाई. मी तं म्हणतो बर झालं हा कोरोना आला, जसा माणसाले जगाचा अधिकार हाय ना..!  तसा आमालेबी होताच ना रे बाबू. एक दोघं जन ठीक हाय, पण तुम्ही लेकहो लयच धिंगाणा सुरु केलता ना. उठले सुटले, अन जवा पायला तवा कुठ..? त चल्ले माया जंगलात. बर मले हेच समजत नई की, तुम्ही मले पावून करता काय बे…? मले पाहाले तुम्ही माया जंगलात येता, त मी काई बोलतो तरी का..? नाई ना…! बर मले येक सांगा, तुम्ही आमाले पायता, त पुढी त्याच करता काय…? पण मंग मी तुम्हाले पाहाले तुमच्या गावात आलो तर काहून कल्ला करता बे मंग..? तुमची त फाट्टे मंग, मंग इचारपूस न करताच मले नरभक्षक अन काय काय म्हणता लेकहो. लाज कशी नई वाटत बे तुम्हाले..! मी बिबट्याचं मुकाट्याने आयकून रायलो. तसबी मंदात बोलून कुठ आपली शेकून घेता. शेकून घ्याले थोडी पुरते. काऊन का तो बरोबरच बोलून रायला होता.
तुम्ही लेकहो आमाले आज ठावकोर लयच परेशान केलं ना..! काजून काय हाय तं, पण आम्ही कवाबी जंगलापशी, नई त गावापशी सहज फिरतानी बी दिसलो, त तुम्ही लेकहो मले लगेच पिंजऱ्याचा रस्ता दाखोता. बह्याळ तोंडेहो, तुमाले हे काउनच समजून नई रायल…? की तुमीच तं आमच्या जंगलात अतिक्रमण करून रायले. तुमाले लाकूड पायजे त, घुस जंगलात. जायाले काड्या पायजे त, घुस जंगलात. गाया म्हशी चाराच्या हाय त, घुस जंगलात, बोर चारोया टेम्भ्र खाचे असल त, घुस जंगलात. तवाच तुमाले जंगल दिसते. हेत काईच नाई राज्या हरण, मोर खासाठी बी हे मातीखाये जंगलात येत रायते. झाड लावाच यायच्या भोकावर येते. पहाड खोदाचा तं यैन सपाटाच लावला. जंगल, पहाड टिकन तं पाणी भेटन तुमाले प्याले. बाबू जंगल हाय म्हणून तलाव, नद्या अन नाल्याले पाणी येते. तुमाले आमच्यामूळ पियाले पाणी भेट्टे, मंग हेच पाणी तुम्ही तुमच्या वावराले हे देता. तुम्ही इतके हेंबाड थूथ्रे हाय की, हे समजून बी तुम्ही न समजल्या सारख करता बे लेकहो. तुमाले झाली हाय फुकटचा माल खाची सवय, जवा पायल तवा तुमाले माया जंगलातला फुकटाचा माल पायजे. जस तुमच्या बाजीचाच मठ हाय. धन्य हाय राज्या तुम्ही अन तुमची माणूस परजाती.


तुम्ही इथीसा गिट्टीच्या खदाणी आनल्या, परकल्प आणले, झाड तोडून अन बगारे पोखरून रस्ते बी केले, आमच्या जंगलावर अतिक्रमण करून वावरं करता, माती, रेटी, गिट्टी पायजे तवा माया जंगलातूनच त नेता. इतके हावरट काउन अन कसेच झाले राज्या तुम्ही लोकं…! बर माय काय म्हणनं हाय..! आमाले तुम्ही काहून परेशान करता राज्या..? आम्ही आजठावकोर तुमच कवाबी काईबी वाकड केल नाई. तरीबी आमच्या जंगलात येऊन काड्या करत रायता. तुमचे ढोर खाल्ले अन कवाकवा तुमच्या अंगावर गुरगुर केली तं आमालेच नरभक्षक म्हणून हिनोता. बर मले येक सांगा की, आम्ही तुमच्या घरात आलो तं आमच स्वागत करता का…! नाई ना..! मंग आमच्या घरात तुम्ही काहून अतिकरमन करता? आमच जंगल तुमच्या सारख ईस्मार्ट नाही पन पवित्र नक्कीच हाय. इत्चा येकही प्राणी इच्चे कायदे कानून मोडत नाही. आम्ही एकमेकाच्या ढुंगणात काड्या बी करत नाही. नीलगाय हागते ना बाबू, तवा तिची हागु बी हत्ती किड्याले जीवन देते. पक्षी, फुलपाखरे, मधमाश्या हाय म्हणून झाडाले फय लागते. वाघापासून ते वायवी परेंत आमची अन्नसाखयी बेज्जा पक्की हाय. आमच्यात लय घट्ट नात हाय. आम्ही एकमेकाले घेऊन संगमंग चालतो. आम्ही जंगलाचा नासोडा नाई हू देल्ला कवा. तुम्ही अन तुमचा ईकास आला अन सारा धिंगाणा लावला बे लेकहो…! सऱ्यात बस्तर परजाती हाय तुमची..!
आमचा ईरोध कायलेच नाई. आमाले तुमच्यासंग काई घेणदेण नाई. तुमच्यासंग आमच काई अडत बी नई. अन तुमच्यावाल आमी काई वाकडबी  करू शकत नाई. तुमाले वाट्टे ना..! घ्या मंग उरावर तो तुमचा ईकास होय का होय त….! तुमचा ईकास तुम्हालेच मुबारक हो बावा, मुबारक हो शिमिटाच जंगल. तिथीसा अशुद्ध हवा, कयक्लं पाणी, निरा लोकायचा बजार अन कल्लाच्या कल्ला…! आमच्या जंगलात मायासकट हरन, आसोल अशे बक्कम प्राणी, पक्षी, साप, फकड्या, सड्डूके, बेंडक्या, मासोया अन कातण्या रायतात. या साऱ्यायले या जंगलान आपल्या पोटात घेऊन यायले आसरा देल्ला हाय. या जंगलाचे उपकार मायाच्यानं तं जिंदगीभर बी फिटू शकत नई. तुमाले आता निसर्गान येक सुधराची शेवटची संधी देल्ली हाय, अजुनबी टाइम गेला नई बाबू, पाहा काय करता त…? झाड लावा, परदूषण कमी करा, माया जंगलाशी दोस्ती करा, परेटनाचा धांगडधिंगा कमी करा, पिलॅस्टीक कचरा कमी करा, सगळ अपोपाप बरोबर करते तो निसर्ग….! हे आखरी मोका हाय भाऊ सुधराच अशीन त सुधारून जा..! इतकंचं बोलला वाघोबा, डोये पाणावले त्याचे अन माये बी. भविष्यात कस हुईन या चिंतेन आम्ही दोघानबी आपआपला रस्ता नापला.

@ यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक,
दिशा फाउंडेशन, अमरावती
www.yadavtartepatil.com
disha.wildlife@gmail.com

(तळटीप- सदर लेख वऱ्हाडी भाषेत असून यातील उल्लेख केलेल्या शिव्यांचा संबंध कुणाशीही लावू नये. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. वऱ्हाडी भाषेचा बाज आणि गोडवा यावा यासाठीच म्हणून तो उल्लेख सदर लेखात केलेला आहे.)

(शब्दार्थ- बगारा = टेकडी, वायवी = वाळवी,  इकास = विकास, शिमिट = सिमेंट, कयक्ल = घाण, आसोल = अस्वल, बक्कम = पुष्कळ, सड्डूके = सरडे, फकड्या = फुलपाखरू, बेंडक्या = बेडूक, मासोया = मासे, कातण्या = कोळी,  परेटन= पर्यटन, कावल्यासारखे= कंटाळा आल्यासारखे)

167 thoughts on “वाघोबाचा लॉकडाऊन…..!”

  1. आहा …. वर्हाडी ठेका ……. मस्तच आर्टिकल…. सुंदर

      1. खूप सुंदर लेख,
        सत्यपरिस्थिती आहे ही सध्या आपले जंगले व त्यातील वन्यजीव सुरक्षित व मोकळा स्वास घेत आहेत.
        तरी माणूस हा प्राणी पुन्हा आपले प्रदूषण चालू करत आहे कालच लाऊड स्पीकर चे आवाज चालू झालेत?

        1. अगदी बरोबर
          सुधारणार नाही माणस
          धन्यवाद

    1. गावरान ठसक्यात सुंदर संदेश दिला हावरट मानवाला…खरंय वाघोबाच नाही सुधारणार आपण… लॉक डाऊन हतू द्या मग पहा जंगलांची हालत….सुधारा रे अजूनही वेळ गेलेली नाहीये….मस्त…धन्यवाद….?

        1. यादवराव, लयं भारी लिवलय तुम्ही..माणसाच्या थुत्थरात बस अशी बाजू लिवली.
          वाचून भल्ला हासलो मी.

          1. धन्यवाद डॉ.नानासाहेब
            गरज होतीच, आभारी आहे.

  2. बाप्पा यादव सर तुम्ही न तर लईच भारी लेख लिव्हला …. लोक काऊन भयाड वानी असं करून राहिले काय माहिती….. …

    1. हाव लिहाव म्हणल जरासक, जमला भूत्ता
      धन्यवाद

      1. खुप चांगलं लिहल भाऊ मज्जा आली तुमचं जंगलावरच प्रेम बघून खुप अभिमान वाटत.
        मस्त

      1. धन्यवाद वकील साहेब
        आपल्या हाती जबाबदारी आहे.

  3. जे प्राण्यांना समजते ते यांना कधी समजन..

    .आता तरी लोकांच्या दिमाखात गोष्टी घुसल्या पाहिजे काहीतरी…… नाहीतर निरा भयाडा वाणी वागतात लोक….

    1. हवं ना सुधरत नई
      आपून आशा करू की सुधरण म्हणून
      धन्यवाद Madam

    2. लयच खास लीवता राव..! पाखरं, जनावर, निसर्ग, यांच्या इचार पदतशिर मांडून मन कालून टाकल.

  4. अगदी खरंय हय तर टे गुरुजी ही माणसाची जात च एक फार मोठा virus आहे हे कधीच सुदरणार नाहीत हे स्वताले संपवून घेतील एके दिवशी, पण तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा खूप चांगले काम करत आहात तुम्ही wildlife conservation व त्याचे महत्व सांगून व त्याची काळजी घेऊन, बघू वाघोबा च्या ह्या सांग ल्याने काही फरक पडतो का

    धन्यवाद

    1. हो ना राजेहो वानखडे सर
      पाहू आता काय होते त..
      बाकी धन्यवाद

  5. सर ….
    लयच खास हो.. वाघोबा भल्ले मनापासून बोलले.

    1. हवं ना राज्या पंकज भाऊ
      वाघ बोलले देव बोलले
      बाकी धन्यवाद

  6. वाघाचे मनोगत तेही वऱ्हाडी भाषेत….! लय भारी…!

  7. अतिशय उत्तम रित्या व्हराडी भाषेतील लेख, वाचतांना खूप मज्जा वाटली, पण मनाला भिडणारे प्रत्येक निसर्गप्रेमींचे हेच मनोगत आहे!!!!
    धन्यवाद !!!असेच लिहीत राहा!!!!???

    1. नक्कीच सर
      खूप खूप आभारी आहे आपला, धन्यवाद

  8. लयच खास. मज्जा आली वाचून जंगलाचा जांगडगुत्ता.

      1. जंगल नेहमी करिता लॅकडाऊन असावेत.

  9. भाऊ खुप्पच छान लिव्हला तुम्ही।
    यातल्या काही शब्दाचा वापर करतो मी कधींकधी।

    1. हाव भाऊ
      सरा माल आपलाच हाय,इदर्भातला
      धन्यवाद

  10. यादव सर , लय भारी लिहिलंय , तुमच्या भाषेत अधिक गोड वाटतंय वाचायला, तुम्ही करीत असलेल्या बारीक निरिक्षणातून चपखल उतरले आहे . तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहून करीत असलेल्या कार्यास खुप शुभेच्छा.

    1. धन्यवाद Madam
      आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत. आभारी आहे.

  11. लय साजरा हायस र तू लेका दोस्ता, त्यायच्या मनातल लिवलस तुवां.
    त्यायले बी वाटत असण गेले कुठं हे माणसं. करा लागते का भाड्यान जिप्सी मानसायले पहायले. अखिन जर आला स्वप्नात तो त सांगजो त्याले हाय म्हणा आपल्या जोळ जिप्सी चाल दाखतो तुले माणसं .

    1. हा हा हा हा
      मित्रां तो असा अश्या भोपाऱ्या करणार नई बाबू
      मस्त हाय तो खोपच्यात आता…

  12. गावरान ठसक्यात सुंदर संदेश दिला हावरट मानवाला…खरंय वाघोबाच नाही सुधारणार आपण… लॉक डाऊन हतू द्या मग पहा जंगलांची हालत….सुधारा रे अजूनही वेळ गेलेली नाहीये….मस्त…धन्यवाद….?

  13. वन्यजीवांच्या मनातील शब्द वाटतात हे, यातून समस्त वन्यप्रेमी म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या लोकांनी काहीतरी बोध घ्यायला हवा.
    सुंदर रेखाटन पाटील, त्यात त्याला आपल्या वऱ्हाडीचा तडका
    खूपच छान ??

    1. पाटील धन्यवाद
      कौन का वाघ खर सांगून रायला म्हून सन्यानी मज्या आली राजेहो,

  14. लई भारी लेख राजेहो। आमले पन अभिमान आहे आमच्या वऱ्हाडी भाषेचा। का बापा किती कोतुक करू। असाच लिवत जा।

    1. आदरणीय सर
      आशीर्वाद राहू द्या, म्हणजे असच लिवत राइन मी,
      आभारी आहे सर

  15. भाऊ खतरनाक हाय वाघोबा ची अनुभवी बोली, I खरी गोष्ट हाय तर नीरा हावसे – गवसे येवून जंगलात धिंगाणा घालतेय, खरीच कंटायून गेला मया मेलघाट चा राज्या…
    लयच झक्कास हाय यादव भाऊ तूय म्हणन आपल्याले त लय पटल बावा…

  16. जंगल नेहमी करिता लॅकडाऊन असावेत.

  17. मुक्या प्राण्यांच्या मनोगत तुमच्या शाब्दिक शस्त्राने उत्तमपणे रेखाटून मानवजातीला एक शिकवनिसोबतच नवे आव्हान दिले आहे. सुंदर लेख.

  18. ✍The Human consciousness is utterly failed to acknowledge that we are just the part of food chain and not the Masters of it… बढिया लेख गुरुजी..
    ..लेखांत वाघोबा अगदी काळजापासून अभिव्यक्त झाला आहे म्हणजे त्याच्या मनांत डोकावणारा नक्की वाघाच्याच काळजाचा असला पाहिजे..
    थोडक्यात काय त…
    मास्तर तुमाले कसकाय सुचते जीबीन अस, वाचलं का भल्ल डोक्स झान्जरते मायबीन..?
    “वाघोबाच्या कायजाचा आमचा मास्तर यादव तरटे पाटील!!”

    1. काय जबरदस्त जंगलाच्या राजाचं आत्मकथन सांगतलं तरटे सर एकदम लाजलाजवाब बेहतरीन .एवढं ऐकून कोणताही अविचारी माणूस भानावर आणण्याची ताकद आपल्या शब्दात आहे तरटे सर.
      सर्व मानवजातीला दिलेला मोलाचा संदेश आहे .या कथेचं घराघरात पारायण व्हावं. अस्सल वर्हाडी मायबोलीत लिहिले असल्यामुळे कथेचा गोडवा प्रचंड वाढला…
      तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
      नितिन वरणकार सर
      राजेश्वर काॅलनी शेगाव जि बुलडाणा

      1. गुर्जी तुमची पावती म्हणजे अस्सल वऱ्हाडी कवीची पावती हाय. धन्यवाघ सर

  19. अस्सल वऱ्हाडी होय

    न. भाऊ हे
    ????

  20. हासता हासता डोळे पाणावले समजलंच नाही, अतिशय सुंदर लिखाण सर! ?

    1. हवं लेका अमेय माझाही तेच हाल झाला होता. धन्यवाद

  21. सर खरच तुम्ही वन्यजीवांच्या मनातले विचार मांडले….
    आणि हो सर तुमचा melghat special लेख वाचायला खूप आवडल ….म्हणजे तुमचा स्वतः चा अनुभव…..

    1. कप्या नक्की लिहितो. धन्यवाघ मित्रा

  22. मले थे कार्टून जमलं असतं त म्या तुमच्या ठोरीतला वाग, व बिट्या आणखी चार पाच जनावराले घेऊन मोगली सारखा हिडिओ काडला अस्ता. मंग माणसाले दाखवला अस्ता, मंग ईचारल अस्त आता कसं वाटून राह्यलं ?
    मस्त ठेचलं तुम्ही आमाले
    छान लिखाण .

    1. सर ठेचाच लागते ना, काय करता निरा म्याट सारखे करून रायले ना हे,
      धन्यवाद सर

    2. सर ठेचाच लागते ना, काय करता निरा म्याट सारखे करून रायले ना हे,
      धन्यवाद सर

  23. Sir tumcha aamhala sadayav abhiman rahil ki aamhi tumche student aahot

  24. सर जी एकदम खास आहे लेख
    खूप छान वाटला आणि खरे आहे.. माणसाने माणसाला ओळखणे सोडले आहे, माणुसकी तर दूरच पण प्राणी मात्र अजूनही माणुसकी जपत आहे, बिचारे त्यांना कोणी सांगत नाही कारण त्यांचेवर अधकाराचा परदा नाही आहेना..???

  25. Bhau, Nice article.
    “Waghoba cha lockdown”
    Assal Varadhi.
    Keep it up.
    Thanks once again.

  26. मस्तच पाटील…… जबरी भाषा अन लेखन सुद्धा…

  27. खूप सुंदर लेख गुरुजी..खूप दिवसांनी वऱ्हाडी भाषेतून लेख वाचायला मिळाला. माणूस खूप स्वार्थी होताना त्याला जंगला विषयी, प्राण्याबद्दल काही देंन घेणं उरलं नव्हतं. बरं झालं कोरोणा आला अंन एका क्षणांत सर्व काही थांबलं.. अता कुठे प्राणी,पक्षी,झाडे मोकळा श्वास घेतील..
    तुमचे कार्याला सलाम.

    1. अमोल धन्यवाद
      अगदी बरोबर काही वेळ का होईना मोकळा श्वास….!

  28. Nature has enough for human need but not for human greed. And this greed has destroyed natural ecological balance. Corona has been blessing for nature in disguise. It has given nature time to recuperate. I hope when man returns he is prudent enough to realise that he is the servant and not the master of the nature.

  29. खुपच मस्त भाऊ…..
    स्वप्नाच्या निमित्ताने जंगली प्राण्यांची व्यथा आपण समाजासमोर मांडली, जंगलसफारी चा अतिरेक आपली मजा व त्यांना सजा आहे, हे खर आहे
    सड्डूक्या, मासोया खुप वर्षानी शब्द ऐकला ….
    मज्जा आली..

    1. आभारी आहे विवेक सर
      आपला वऱ्हाडी टोला होय ना हा..
      धन्यवाद

  30. मी पहिल्यांदा व-हाडी भाषेतल लिखाण वाचलय… व-हाडी भाषेचा गोडवा न्याराच आहे…. वाघोबा खरच असाच विचार करत असणार… तुम्ही तुमच्या लेखातून माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलय…कोरोनामुळे का होईना माणसाला निसर्गाच महत्व समजले तरी पुढच्या येणा-या काळ सुखावह असायला हवा. प्राण्यांसाठी आणि माणसासाठी ही… तुमच्या लेखातील भाषेने खुप हसले मी… माणुस यापुढे निसर्गाच्या नियमानुसार जगेल असा आशावाद ठेवुया…..

    1. हा हा हा
      वऱ्हाडी भाषेचा बाज आहेच तसा, तुम्ही हसल्या म्हणता, मला छान वाटलं,
      चलो किसीको तो हसाया मेरी कलमने,
      शायद वाघोबाने दुवा कुबूल की होगी….!

      खूप खूप आभारी आहे Madam

  31. क़ाय बाबा लेखणी व्हय तुही वाली.. लई बेस.. थो वाघोबा तं लमचा अस्सल मराठी मर्द च असल बुवा..??

    अतीशय कल्पक, समर्पक आणि पूरेपूर विनोदी मांडणी.. तुझ्या लेखणित धार आहे, वजन आहे, बाणा आहे…? हा असाच कायम ठेव, समाजाला बदलावयाचे तेजस्वी अस्त्र आहे हे.

    उज्वल भविष्याच्या कामनेसह..

    जंगलवेडा उमेश
    ?????

    1. एका जंगलवेड्या वनाधीकाऱ्याची दाद मला उभारी देणारी असणारच…! अतिशय समर्पक बोललात सर..
      खूप खूप धन्यवाद..
      तुमचाच मोगली 😉

  32. लई भारी लिवलं की राव तुमी. वाघोबा नी बिबटची कैफियत तं येकदम झ्याकच तां हाय वो. परत्येक्ष जंगलचा राजाच असा खेळण्यातल्या वागावानी केलाता न काय. कोरोनाचं आभारच मान्ल पायजेत का सम्द जंगल जनावरांना मिळालं. आता यो लॉकडाऊन उठला का मंग परत पैले दिस येनार बा. जनावरं परत कोंडली जानार न मानूस परत जिपड्यातून गरागरा फिरनार. तवा आसं वाटतया की कसं वो होनार आमच्या जंगलांच न जनावरांच !!

    1. बरोब्बर सर्जी
      जमला भूत्त्ता, हे हकीकत हाय, धन्यवाद

  33. जसा वऱ्हाडी ठेचा तस वऱ्हाडी लीवल. वाच्याले मज्जा आली वाचून ठसकाही बसला. कुला मामाले समझ्याले आल पण माणसाले नाही.

  34. जसा वऱ्हाडी ठेचा तस वऱ्हाडी लीवल. वाच्याले मज्जा आली वाचून ठसकाही बसला. कुला मामाले समझ्याले आल पण माणसाले नाही.

  35. भल्ला मस्त लिहिला पाटील साहेब.
    लयच आवडला. माया बोलण्यात मराठी शब्द आपसूकच येते.
    बोलल्यावर लक्षात येते चीभैन आपण काही सुदरत नाही.
    मायी बायको त लय चेष्टा करते भाऊ.
    आता तिले वाचून दाखवतो. किती गोड आहे माही वऱ्हाडी बोली.
    लय मजा आली भाऊ . असंच लिहित जा.
    राम राम पाटील. ?

    1. राम राम गुर्जी
      मायीवाली बी म्हणी कसे बोलता, आता तिले पटल का कसा रस हाय वऱ्हाडीत आपल्या. धन्यवाघ गुर्जी

  36. Aaha . . . Msta…Jamal rao …yakach number ???️?️?????️?️??????????????????

  37. अतिशय सुंदर, चिंतन करायला लावणारा लेख!! वऱ्हाडी ठसक्यातली मांडणी थेट मनाला भिडून जाते आणि डोळे खाडकन उघडतात, पण शेवटी मानवच आहे तो सुधारणार थोडाच!! वन्य जीवांच्या अगदी मनातलं लेखात उतरलं आहे!! अभिनंदन मित्रा!!

  38. एकदम मस्त गावरानी भाषा सरळ स्पष्ट शब्दात मांडलेले विचार सहजपणे समोरच्याला समजेल अस छान लिहिलं तुम्ही.. माणसाच्या सवयीं आणि कुत्र्याच वाकड्या शेपूट मधे फार फरक नाही. मिळालं तेवढं घेऊन घ्या हे माणसाची सवय. समाधान नाहीच..

  39. लय मंजी लयच भारी ..न …दा……आज खुप दिवसानी या भाषेतील गोडवा अनुभवता आला…….बाकी वाघोबाची खंत आम्हा पर्यंत पोहचविणार्या हे निसर्ग दुता तुम्हाला व तुमच्या लेखणीला माझा मानाचा मुजरा………
    धन्यवाद सर जी!!!!!!!!!!

    1. MADAM धन्यवाद खूप खूप
      निसर्गाची कृपा आहे.

  40. एकदम मस्त गावरानी भाषा सरळ स्पष्ट शब्दात मांडलेले विचार सहजपणे समोरच्याला समजेल अस छान लिहिलं तुम्ही.. माणसाच्या सवयीं आणि कुत्र्याच वाकड्या शेपूट मधे फार फरक नाही. मिळालं तेवढं घेऊन घ्या हे माणसाची सवय. समाधान नाहीच..

  41. आपलं काम भारी आपलं लिखान भारी आपलं वाघोबाच लाॅकडाऊन तेच्यापेक्षा बी लयी भारी यादव तरटे पाटील तुम्हीची कल्पनात लयी लयी‌ भारी.

  42. आपलं काम भारी आपलं लिखान भारी आपलं वाघोबाच लाॅकडाऊन तेच्यापेक्षा बी लयी भारी यादव तरटे पाटील तुम्हीची कल्पनात लयी लयी‌ भारी

  43. ‘Assal varhadi tadaka dila Patil tumhi ‘
    Vastav paristhitiche Bhan haravlelya ajachya samajasathi aushadhi Che Kam karato ha savand.

  44. Excellent, kharach ek like sathi Vanya jivnala vethis dharti apan, corona ne dakhvla ek skhukshma jivanu hi aplya najar dam karu shakto, mansa ata tari sudhar

  45. यादवजी इक्कास तुम्ही नेहमीप्रमाणे छान लिहिले आहे. यावेळी तर त्याला वऱ्हाडीचा तडका ही दिला आहे. वऱ्हाडातील अमरावीतीचे यादवजी व मेळघाटातील वाघोबा यांच्यातील क्हाडी भाषेतील संवाद अंतः मुख करणारा आहे .

    1. आदरणीय सर
      खूप खूप धन्यवाद
      हा संवाद खरोखर स्वप्नात झालेला आहे. खूप आभारी आहे सर

  46. मले त असं वाटते बावा कि,वाघोबा मलेच मनुंन रायला,कि हेंबाडथुत्र्या आता तरी सुधर….

  47. लिखाणाची झकास शैली हाय वऱ्हाडी भाषा जिती आहे यावरून सिद्ध होते, आपला लेखन प्रपंच असाच वृद्धिंगत व्हावा आशा शुभेच्छा,

  48. अप्रतिम ,भन्नाट वऱ्हाडी लेख,वाचताना खूप मजा आली,खासकरून वऱ्हाडी शब्द जसे #झ्याम्या# बरच काही शिकवून जातो

  49. खूप खूप सुंदर लिखाण यादवराव…

    1. धन्यवाद परीक्षित राव, खूप खूप आभारी आहे.

  50. साहित्यिक बशेसोबतच आपल्या माय मराठी वऱ्हाडी मातृभाषेवरही तुमची चांगली पकड आहे,, वाघाचं व वन्यजीवांच दुःख तुम्ही अगदी विनोदी शैलीत पण तेवढंच गंभीर होण्यास लावेल आशा शब्दात मांडलं,, तुमच्या लेखणीला व कल्पकतेला सलाम???

  51. प्रत्येक भाषेचा एक साज, ठसा असतो. वऱ्हाडी अगदी प्रथमच अनुभवली. ज्याना आनंद घेता, उपभोगता आला ते खरंच खूष होणार यात शंका नाही, सद्भागी. मला त्यांचा हेवा, मत्सर वाटू लागला.
    एक महत्त्वाचा विषय, मुद्दा आहे. वनप्राणी-मनोगत हे लिहीणं आपण म्हणतो तेवढं सोपं नाही. त्यासाठी प्राणी होऊन जगावं लागतं, एकरूप व्हावं लागतं. तुम्ही तर त्या सर्वांचे ‘मोनाली’ झाला आहात, त्यांच्यातले झाले आहात म्हणून आपण असं छानपैकी लिहू शकला, शकता. आम्ही त्यांच्या क्षेत्रांत फिरलो, एक कुतूहल. याखेरीज काही नाही. मनोगत लाजबाब आहे. ‘माणूस’ सुधारला पाहिजे. याविषयी मी काही लिहू इच्छित नाही. मला वाटतं: सगळीकडे अतिक्रमण करणे, तयांचे नियम मोडणे हे आम्ही प्रामाणिकपणे पाळतो,करतो. निसर्ग नियम मोडणे असा नवा आपला नियम करणे व तो जन्मसिध्द हक्क म्हणून अंमलात आणणे हे नि एवढे मात्र मनापासून करतो.
    “जंगल लॉकडाऊन” हे कडक व्हावं. कायम स्वरूपी झालं तर हवंहवंसं, हवंच आहे. आठवड्यातून काही दिवस तर नक्की ‘सील’ करावा. त्यांना मुक्तपणे संचार करु द्या ना.
    मन मोकळं झालं. मन:पूर्वक धन्यवाद व अभिनंदन.

    1. आदरणीय देसाई सर
      अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्यात आणि येतही आहेतच. मात्र आपली प्रतिक्रिया मला भावनिक करून गेली.
      खूप खूप आभारी आहे सर

  52. प्रत्येक भाषेचा एक साज, ठसा असतो. वऱ्हाडी अगदी प्रथमच अनुभवली. ज्याना आनंद घेता, उपभोगता आला ते खरंच खूष होणार यात शंका नाही, सद्भागी. मला त्यांचा हेवा, मत्सर वाटू लागला.
    एक महत्त्वाचा विषय, मुद्दा आहे. वनप्राणी-मनोगत हे लिहीणं आपण म्हणतो तेवढं सोपं नाही. त्यासाठी प्राणी होऊन जगावं लागतं, एकरूप व्हावं लागतं. तुम्ही तर त्या सर्वांचे ‘मोनाली’ झाला आहात, त्यांच्यातले झाले आहात म्हणून आपण असं छानपैकी लिहू शकला, शकता. आम्ही त्यांच्या क्षेत्रांत फिरलो, एक कुतूहल. याखेरीज काही नाही. मनोगत लाजबाब आहे. ‘माणूस’ सुधारला पाहिजे. याविषयी मी काही लिहू इच्छित नाही. मला वाटतं: सगळीकडे अतिक्रमण करणे, तयांचे नियम मोडणे हे आम्ही प्रामाणिकपणे पाळतो,करतो. निसर्ग नियम मोडणे असा नवा आपला नियम करणे व तो जन्मसिध्द हक्क म्हणून अंमलात आणणे हे नि एवढे मात्र मनापासून करतो.
    “जंगल लॉकडाऊन” हे कडक व्हावं. कायम स्वरूपी झालं तर हवंहवंसं, हवंच आहे. आठवड्यातून काही दिवस तर नक्की ‘सील’ करावा. त्यांना मुक्तपणे संचार करु द्या ना.
    मन मोकळं झालं. मन:पूर्वक धन्यवाद व अभिनंदन

    1. काकू खूप खूप आभारी आहे. आपला आणि माझ्या लाडक्या सरांचा मला आशीर्वाद आहे.

  53. अप्रतिम रेखाटन !

    असेच लिहीत राहावे, अनंत शुभेच्छा !

  54. खूपच सुंदर लेख…… अंतर्मनाला चटका लावणरा

  55. यादव सर आपण तुमचा मित्र सुमित चांडक यांच्या ऑफिस मध्ये भेटलो होतो. मी तुमचाच विद्यार्थी होतो युनिक ऍकॅडमी मध्ये.
    तुम्ही लिहिलेला लेख अतिशय आवडला आणि खूप शिकायला पण मिळालं. जमेल तितक्या लोकांपर्यंत हा लेख पोहोचउन जागृत करण्याचा नक्की यशस्वी प्रयत्न करेल.
    “सर तुम्ही लिवलेला लेख लय आवडला मले. आन भाषा बी लई झकास होती ना सर. तुमाले खरंच तोड नाय सर.??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *