छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण ‘वेडा राघू’ नावाने जरी बारसं केलं असलं तरीही हा पक्षी वेडा नक्कीच नाही. चाणाक्ष असलेले हे पक्षी मानवी हालचाल व वर्तनाचा अंदाज अतिशय उत्तमरीत्या घेऊ शकतात. मानवप्राण्यापासून आपल्या घरट्यांना व पिल्लांना काही धोका तर होणार नाही ना..! याचाही अंदाज घेण्याची त्यांची उत्तम क्षमता असते. धोका वाटल्यास घरट्याची जागा लपवण्याचा प्रयत्न ते करू शकतात. हे एका अभ्यासाअंती पुढे आलेले आहे.
वेडा राघू हा पक्षी किटक भक्षी आहे. इंग्रजीत याला लिटील ग्रीन बी इटर (Little Green Bee-eater) म्हणतात. याचे शास्त्रीय नाव मेरोप्स ओरीयंटलीस (Merops orientalis) असे आहे. तो मुख्यतः फुलपाखरे, चतुर व इतर कीटक खातो. तसेच मधमाशा आवडीने खातो म्हणून हा पक्षी ‘बी ईटर’ नावाने प्रसिद्ध आहे. उष्ण कटिबंधीय प्रदेशात हा सहज आढळतो. हा पक्षी आपल्या भागात सहज दिसत असला तरी गेल्या काही वर्षात याची संख्या कमी होत आहे. मातीचे वाढते प्रदूषण व अधिवास अवनती हे मुख्य कारण मानले जात आहे. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने हे पक्षी समूहाने घट्ट बिलगून एकत्र बसतात. सकाळी व सायंकाळी त्यांची मातीत आंघोळ (Mud Bath) करण्याची सवय वैशिष्ट्यपूर्ण आहे. वेडा राघु पक्ष्याला विजेच्या तारांवर बसने अत्यंत आवडते. तारेवर बसलेला असताना हा पक्षी मस्त घिरट्या मारतो. उडतांनाच हवेतल्या हवेत भक्ष्य पकडून पुन्हा तारेवर बसतो. मधमाश्या पकडण्यासाठी हा पक्षी हवेत वाकड्या तिकड्या घिरट्या मारतो. हवेतील मधमाशा आपल्याला दिसत नाही, मात्र या पक्ष्याला दिसतात. पाहणाऱ्याला वाटत की हा पक्षी उगाच घिरट्या मारतोय. वेडा झाला की काय? वाकड्या तिकड्या घिरट्या मारून अतिशय शिताफीने मधमाशी पकडतांना तो भांबावून जातो. म्हणून तो परत त्याच जागी येऊन बसत असल्याने याच नामकरण ‘वेडा राघू’ अस झालंय. वाकड्या तिकड्या घिरट्या मारणे, भांबावून परत परत त्याच जागी बसने, दिसायला पोपटाच्या हिरव्या रंगाचा असणे, त्यामुळे याच नाव वेडा राघू पडले असावे. निसर्गात कीड नियंत्रण अतिशय महत्वाचे असून अन्नसाखळीच संतुलन पक्षी ठेवतात. किटकांची संख्या नियंत्रित राहिली तरच हे निसर्गचक्र सुरळीत चालणार आहे. वेडा राघू सारखे पक्षी हे पर्यावरण संतुलनाचे खरे शिलेदार होय. किटकांच्या संख्येवर मोफत नियंत्रण ठेवणारे वेडे राघू पक्षी वास्तविकता निसर्गचक्रात अतिशय महत्वाचे आहे. त्यांचे अस्तित्व हे मानवाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने फायद्याचे आहे. वेडा राघू पक्ष्यांच्या ह्या विविध मुद्रा अमरावती विभागाचे विभागीय उपायुक्त श्री. गजेंद्र बावणे यांनी टिपलेल्या आहेत.
निसर्ग संतुलनात वेडा राघू व सर्वच पक्ष्यांच महत्वपूर्ण योगदान आहे. पक्षी हे शेतकऱ्यांचे मित्र, वनस्पतींचे बीजप्रसारण, निसर्गाचे सफाई कामगार व अन्नसाखळीचे संतुलन अशा अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मानव निसर्गाला प्रचंड हानी पोहोचवून जीवन जगतोय, तर वेडा राघू निसर्गासोबत सहजीवन साधतो आहे. निसर्गात अतिशय महत्वाचा असलेल्या या पक्ष्याचे नाव आपण ‘ वेडा राघू’ ठेऊन मोकळे झालोय. मात्र खरा वेडा कोण..? आपण की हा राघू….?
© यादव तरटे पाटील
सदस्य – महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
संपर्क – ९७३०९००५००
छान माहीती यादव जी ???
धन्यवाद सर
खुप छान लिहिलंय सर, आणि नवीन माहिती मिळाली.?
Thank you Prashant
खूपच सुंदर माहिती सर जी
धन्यवाद छगन जी
खूपच छान माहिती दिलीत सरजी..
धन्यवाद madam
पोपटा सारखा दिसतो , रंगानी म्हणून राघू,, किड्यांच्या मागे वेडया सारखा लागतो गिरकी घेतो म्हणून वेडा।।।।।।
असा हा वेडा राघू
धन्यवाद साहेब
Awesome article.
While reading curiosity strikes for next bird.
It give new point of towards birds
Thank you very much for your valuable comment.
खूपच सुंदर माहिती सर जी
मस्त ?
Thank you very much
Thanks for your great work
धन्यवाद सर
????