एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं फर्मान काढतो. कारण पक्षी येणाऱ्या पिकांच धान्य खातात. फर्मान काढताच लोकं कामाला लागतात. कुणी औषधांची फवारणी तर कुणी शिकार करू लागतात. मग काय पाहता पाहता गावातील पक्षी नाहीसे होतात. आता मात्र एकीकडे आकाशात एकही पक्षी उडताना दिसत नाही, सगळं आभाळ सुनं होऊन जातं. तर दुसरीकडे त्या मुलीच्या जीवाला काही चैन पडत नाही. ती मुलगी पक्षी व त्यांची अंडी तिच्या घरात लपवते. तिच्या आश्रयाने पक्षी राहतात. काही दिवसांनी अचानक टोळधाड येते. टोळधाड म्हणजे शेतातील धान्य खाण्यासाठी किटकांची लागलेली सामुहिक स्पर्धाच होय. मग काय गावकरी चिंताग्रस्त व सुन्न होऊन होणार नुकसान पाहतात. गावकऱ्यांना झालेल्या चुकीची जाणीव होते. त्यांना आता पक्ष्यांची आठवण येते. पक्षी असते तर त्यांनी हे टोळकीटक खाल्ले असते. आपली पिके वाचली असती, असे शेतकऱ्यांना मनोमनी वाटू लागते. पण शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की, आपण तर सगळे पक्षी मारून टाकले, आता पक्ष्यांना आणायचे कुठून..? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.
खर तर पृथ्वी आपल्या मालकीची नाही. इथे आपण विश्वस्त म्हणून जगतो आहे. निर्मात्याने आपल्या हाती सोपवलेला हा खजिना आहे, जो की भावी पिढीचा देखील आहे.” पण याची जाणीव मात्र आपल्यापैकी किती लोकांना आहे हा प्रश्न नेहमी पडतो. बालपणी आकाशात उडणारे पक्षी बघितले, फुलाभोवती रुंजी घालणारे फुलपाखरू बघितले, धावणारे सरडे पहिले, धोका वाटताच दबा धरून बसणारे ससेही दिसले, डराव डराव करणाऱ्या बेडकांचा आवाजही ऐकला. हे सगळ अजूनही आठवतच. निलगाय काही दिवस एकाच ठिकाणी विष्टा करते. निलागायींच्या लेंड्याचा ढीग म्हणजेच आपण त्याला ‘मखर’ म्हणतो. याच मखरीवर ‘हत्ती किडा’ (Dung Beetle) आपली गुजरानचे नव्हे तर आपली जीवनक्रियाही पूर्ण करतो. मुंग्या त्या लेंड्यामधली गोडवा चाखायला येतात. मुंग्यांना खायला कोळी येतात. कोळ्यांना खायला पक्षी येतात. म्हणजेच पक्ष्यांना आणि हत्ती किड्यांना ती मखर एक ‘रेस्टॉरंट’ म्हणून काम करते असे अनेक उदाहरण देता येतील. निसर्गातील मैत्री आणि निसर्गनिर्मित जंगलातील प्राण्यांची एकमेकांशी असेलेली मैत्री असा नव्याने नातेसंबंध मनात फुलताना आपण जंगलात अनुभवत असतो. जंगल आणि आपलं तसेच जंगलातल्या जंगली प्राण्यांचा आपलं एक स्वतंत्र नात असतं.
बहुतेक वन्यप्राणी मायाळू असतात. त्यांच वागणं देखील कित्येकवेळा आपल्याला आश्चर्यकारक वाटत. ते एकमेकांना मदतही करतात. मैत्री आणि प्रेम करू शकतात. प्राण्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध सामान्य नाहीत. त्यांची अभिव्यक्ती मजेदार असते. त्यांना पाहण्यात त्यांच निरीक्षण करण्यात आपण गुंग होऊन जातो. वन्यजीव छायाचित्रकार किंवा चलचित्रकार वेडे होतात तर प्रसंगी त्यांची स्पर्धाही लागते. सामान्य माणसापर्यंत आजवर वन्यप्राण्यांच्या शत्रुत्वाचेच किस्से पोहोचतात तर प्रसंगी ते अधिक चघळल्या देखील जातात. खर तर भिन्न भिन्न प्रजातींचे प्राणी सुद्धा मित्र बनू शकतात. जंगली प्राण्यांमध्ये असी मैत्री पाहायला मिळते. या मैत्रीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष किस्से पाहून आपण दंग होऊन जातो. प्राणी, पक्षी, फुलपाखरे, साप, सरडे व इतर जैवविविधता ही मुळात मैत्रीपूर्ण सुद्धा आहे. केवळ अन्नसाखळी आणि अन्नजाळ या संदर्भाने विचार करून चालणार नाही. हा त्याला खातो, तो त्याला आपलं भक्ष बनवतो, इतकंच आपण पाहत असतो. पण याहून पलीकडे त्यांची दुनिया आहे. जगण्यापुरती शिकार आणि पोटापुरती भूक भागली की वन्यप्राण्यांचा विश्व अगदी निरामय भासते.
निलगायींची मखर जशी हत्ती किड्याला जीवन देते तसेच जंगलात असे अनेक किस्से मैत्रीचे आपल्याला अनुभवायला येऊ शकतात. एकदा एका वानराची बिबट्याने शिकार केली. त्या माकडाला एक लहान पिल्लू होत. बिबट्याला पिल्लू दिसताच बिबट्याने त्याच केलेलं संरक्षण आणि त्याची चित्रफीत काही दिवसापूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यात शिकार केली वानराची मात्र पिल्ल्याच केलेलं संरक्षण हे प्राण्यांच्या मैत्रीच, संवेदनेच, मैत्रीच एक प्रतिक म्हणता येईल. अस्वल आणि अमलतास झाडांची मैत्रीही तशीच आहे. अस्वालाला अमलतास म्हणजेच बहावा, जांभूळ बोर ई. झाडांची फळे आवडीची आहे. बहाव्याला शेंगा लागल्या, जांभूळाला जांभळ आणि बोराला बोर लागलीत की अस्वल ते बक्कळ खात सुटत. मग काय जिकडे तिकडे अस्वलाच्या विष्टेतून या झाडांच्या बियांचा प्रसार होतो. अस्वलाने आपलं पोट भरायचं आणि झाडांच्या प्रजातींचा प्रसार करायचा. सुतार पक्ष्यांच आणि झाडांची एक अनोखी मैत्री आपल्याला पाहायला मिळते. झाडाच्या खोडाला लागलेल्या कीडीतील किडे सुतार खातो. म्हणूनच सुतार पक्ष्याला झाडाचा डॉक्टर देखील म्हणतात. झाडांवर असलेली किडी झाडांनी खाऊ द्यायची आणि सुताराला त्याच झाडात छिद्र करून घरटी करू द्यायच. आपला राज्यपक्षी हरोळीसह बुलबुल, हळद्या, मैना आदी पक्षी झाडांची फळे खातात तर त्यांच्या विष्टेतून झाडाच्या बियांचा प्रसार होतो. खर म्हणजे जंगलात झाड कोण लावत..? तर प्राणी पक्षी यांच्या विष्टेतून जंगल घडत असतं. वानरे झाडांची कोवळी पेरे खातात म्हणून काही झाड सरळ वाढतात. वानरांच पोट भरन्यासह झाडातील औषधी गुणही मिळतात आणि त्यांच्या विष्टेतून झाडाचा प्रसार होतो. वड, उंबर, पिंपळ अश्या नाना प्रकारच्या वृक्षसंपदेन एखाद जंगल असच थोडी ना फुलणार…! फुलपाखेरेही यात कुठेच मागे नाही. फुलपाखरे, मधमाश्या व इतर कीटक फुलातील मकरंद टिपतात तर त्यामुळे परागीभवन होण्यास मोलाची मदत होते. कीटकांच पोट भरत तर सपुष्प वनस्पतींची नवी पिढी घडण्यात सहकार्य करतात. जंगलात ‘क्रोटालारीया’ वनस्पतीची पान मुंग्या तोडून नेतात. तर त्यांतून निघणार रस फुलपाखरांचे सुरवंट आवडीने पितात. मुंग्या आणि फुलपाखरू यांची ही अनोखी मैत्री अनादी कालापासुन चालत आलेली आहे. कावळ्याच्या घरट्यात कोकीळ अंडी देते. तसच चातक पक्ष्याच सुद्धा आहे.
भारतात १६५ प्रकारचे पक्षी स्थलांतर करून येतात. काही हिवाळी पाहुणे तर उन्हाळी पाहुणे असतात. आफ्रिका आणि दक्षिण युरोपातून येणारा चातक पक्षी स्वतः घरटी बनवत नाही. तर तो आपली अंडी सातभाई पक्ष्यांने बनविलेल्या घरट्यात अंडी देतो. अंड्यांच आकार आणि रंग सारखाच असतो. ही सुद्धा एक अनोखी मैत्री आपल्याला दरवर्षी मान्सून येताच अनुभवायला येते. माणसांच्या मैत्रीच्या गोतावळ्यात आणि मैत्री दिनाच्या कल्लोळात जंगलातली ही मैत्री प्रेरणादायी आणि सहजीवन शिकविणारी आहे. जंगल आणि जैवविविधता आपल्याला जीवन देते. आज मैत्री दिन आहे, या निमित्ताने निसर्गाशी नव्याने मैत्री करण्याचा संकल्प करुया. आपल्याला विनामूल्य प्राणवायू, पाणी आणि अन्न देणाऱ्या निसर्गाशी मैत्री करुया…..!
@ यादव तरटे पाटील
सदस्य – राज्य वन्यजीव मंडळ, महाराष्ट्र शासन
संपर्क – ०९७३०९००५००
इमेल – disha.wildlife@gmail.com
संकेतस्थळ – www.yadavtartepatil.com
वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…
छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…
Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…
फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…
Butterflies are known for their beauty, the beauty of nature. The world of butterflies is…
View Comments
Aj Nisargashi maitri krnyacha Diwas ahe... Happy Friendship Day to All..
very true. Thank you very much madam
आज आपल्या लेखणीतून पर्यावरनातली वन्य प्राण्यांची मैत्री अनुभवास मिळाली.... आपणास व माझ्या सर्व वन्यजीवास मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
धन्यवाद निलेश राव
Very nice observations sir ??its really time to make friendship with nature ?
Thank you very much madam
नेहमप्रमाणेच अत्यंत माहितीपूर्ण व निसर्ग ,पर्यावरण व वन्यजीव याची आवड निर्माण करणारा लेख.आजच मी अतुल धामणकर यांचं अरण्य वाचन पुस्तक वाचायला घेतलं.प्रत्यक्षात आपल्या समवेत निसर्गवाचनाचा योग यावा अशी इच्छा आहे.
प्रत्यकाने निसर्गाला मित्र बनवणे हीच काळाची गरज
दिशा परिवारास मैत्री दिनाच्या शुभेच्छा
Khupach chaan
Thank you Dear Sandeeprao
खुप छान माहिती दिली आहे. आपण सर्वांनी फक्त निसर्ग जपला तरी तो (निसर्ग) खऱ्या मित्राप्रमाणे फक्त देत जाईल.....
Thank you Madam. अगदी बरोबर
निसर्ग आपला मित्र आहे म्हणून आपल्या सोबत आज आपले मित्र आहे ....First Friend our Nature ....Plants Lover Save Nature, Save Biodiversity.
अगदी बरोबर, धन्यवाद साहेब
So nice
धन्यवाद madam
अगदी सुरेख
thank you
खरी निसर्ग माया, उत्तम लेख!??
Thank you very much
खूपच छान माहिती दिली सर आपण. निसर्ग हा सुद्धा मानवाप्रमाणे जिवाभावाचा एक आपला मित्र आहे आज जर आपण त्याला जपलं तर तो आपल्याला व आपल्या येणाऱ्या पिढ्यांची काळजी घेईल.
Very sweet information. And we always thanful to nature.
Thank you very much
प्रिय यादव, मैत्री दिवसाच्या खूप शुभेच्छा.
तुझ्या प्रत्येक लेखातून तू आम्हाला निसर्गामध्ये एकरूप करून टाकतोस... तुझे हे निसर्सागशी असलेलं मैत्रीचे नाते आणि त्यावरील लिखाण यामुळे आम्हाला पण निसर्गाचा जवळून पाहता येते.
खरंच माणसाने निसर्गाकडून "खरी मैत्री" काय असते हे शिकले पाहिजेच... जंगलातील प्रत्येक घटक एकमेकांची कशी काळजी घेतात, हे तू सुंदर उदाहरण देऊन सादर केलेस... कोरोना काळात तर तुझ्या लेखाचं महत्त्व काही वेगळेच आहे.
धन्यवाद सर
खूप खूप आभारी आहे.
वाचत रहा आणि अश्याच शुभेच्छा देत रहा
धन्यवाद सर